नंदा खरेंनी वैचारिक प्रबोधनाला वेगळ्या स्तरावरचे कार्यच मानले आहे. त्या अर्थाने ते ‘ॲक्टिव्हिस्ट’च आहेत. उत्तर-आधुनिकतावाद उर्फ ‘पोस्ट-मॉडर्निझम’च्या ‘इंटेलेक्चुअल फॅशन’च्या विरोधात ते ‘वैचारिक तलवार’ घेऊन उभे ठाकतात

‘नंदा खरे निर्मित-दिग्दर्शित’ ही एक न स्थापलेली, अदृश्य भासणारी, पण अस्तित्वात असलेली संस्थाच होती. या सर्व व्यापक नेटवर्किंगचे व त्यातून येणाऱ्या मुद्द्यांचे, तसेच समाजातील समस्यांचे दर्शन आपल्याला या लेखनात प्रत्ययास येते. किंबहुना म्हणूनच कार्यकर्ते त्यांच्याकडे सातत्याने येत, त्यांच्याशी चर्चा करत आणि काही बौद्धिक / वैचारिक शिदोरी बरोबर घेऊन जात.......

गेल्या काही वर्षांत ज्या विकृतींचा प्रादुर्भाव व विस्तार होऊ लागला, त्याबद्दलचे चिंतनही याच मध्यमवर्गातले सुजाण लोक करू शकतील आणि हा भस्मासूर गाडू शकतील!

आपले आणि आपल्या कुटुंबाचे जीवनमान अधिक चांगली व्हावे, अशी आकांक्षा ठेवण्यात काही आक्षेपार्ह नाही. प्रत्येकाची धडपड व प्रयत्न त्यासाठी असतो. जगातल्या सर्व ‘ट्रेड युनियन्स’चा संघर्ष अधिक उत्पन्नासाठी, अधिक चांगल्या कामाच्या सुविधांसाठी आणि अधिक व आधुनिक तंत्रकुशल कामासाठी असतो. ती भौतिक वा ऐहिक सिव्हिलायझेशनची गती आहे. पण जेव्हा वास्तव आकांक्षा अवास्तव महत्त्वाकांक्षांचे अक्राळविक्राळ रूप धारण करतात.......

हा ग्रंथ केवळ नेहरू कुटुंबाचा इतिहास, त्यांचा वारसा, त्यांचा विचार, यांपुरता मर्यादित नाही. हा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांचा झपाटलेला आढावा आहे

पंडित नेहरू हयात असताना, लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, जगभर त्यांची प्रचंड प्रतिष्ठा असतानाही, ‘नेहरूंनंतर कोण?’ या प्रश्नाची उघड चर्चा होत असे. वेक्स हॅन्गेन या तत्कालीन ख्यातनाम अमेरिकन पत्रकाराने १९६० ते १९६३ या काळात, भारतीय राजकारणाचा सखोल अभ्यास केला. अशा अनेक नामवंत नेत्यांच्या तसेच मुत्सद्द्यांच्या, पत्रकारांच्या आणि अभ्यासकांच्या मुलाखती घेतल्या. नेहरू हयात असतानाच त्यांनी एक ग्रंथ लिहिला - ‘After Nehru, Who?.......